BARTI Bank PO & Clerk Exam Coacing

एक पान संघर्षाचे भित्तिपत्रक प्रदर्शन उद्घाटन
यशवंतराव चव्हाण समाज विकास प्रतिष्ठाण, प्रकाश नगर,लातूर येथील बार्टी मार्फत घेण्यात येणाऱ्या IBPS परिक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त त्यांच्या संघर्षमय जिवनाचे भित्तीपत्रक बनवून अभिवादन केले.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून मा. डॉ. अंकुशकुमार चव्हाण मराठी विभाग प्रमुख दयानंद महाविद्यालय, संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ .शिवाजीराव जवळगेकर सचिव मा. दिगंबर जेवरीकर उपाध्यक्ष स्वाती जवळगेकर , परिक्षक बळीराम मोटेराव, तसेच प्रा. डॉ .आरिफ शेख, राजू कांबळे ,सौरभ म्हेत्रे आदी मान्यवर तथा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे. यशवंतराव चव्हाण समाज विकास प्रतिष्ठान, लातूर.
आयोजीत अतिथी व्याख्यान प्रा. प्रतिक पितांबरे

IBPS निवासी प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी म्हणून कांबळे विनया संजय या विद्यार्थिनीचे चंद्रपूर येथे पोस्ट ऑफीसमध्ये “BPM”या पदावर निवड झाल्याबद्दल आपल्या YCSVP या संस्थेचे संचालक डॉ. शिवाजीराव जवळगेकर सर व इतर प्राध्यापक सरांच्या हस्ते शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला

भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त Rally for Knowledge चे आयोजन करण्यात आले.
या रॅली दरम्यान बार्टी अंतर्गत लातूर येथील यशवंतराव चव्हाण समाज विकास प्रतिष्ठान प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीने बाबासाहेबांच्या विचारातील युवक हे पथनाट्य सादर केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे. यशवंतराव चव्हाण समाज विकास प्रतिष्ठान, लातूर. आयोजीत अतिथी व्याख्यान श्री. अल्ताफ शेख